आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थांची नाराजी:शासनाच्या समितीत अनुभवी दुर्गसंवर्धन संस्थांना डावलले, आंदाेलनाचा इशारा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने राज्यातील गड, किल्ले यांचे संवर्धन करण्यासाठी समिती गठीत केली असून समितीत नाशिक विभागासह वसई, पालघर विभागातील गड, किल्ले या संदर्भातील अभ्यासू, अनुभवी आणि प्रत्यक्षात काम करणाऱ्या संस्थांना डावलले असल्याची तक्रार शासनाकडे करण्यात आली आहे.

सांस्कृतिक, पर्यटन मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना थेट पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. अनुभवी दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांना प्रतिनिधित्व द्यावे यासाठी शिवकार्य गडकोट संवर्धनचे राम खुर्दळ आणि वसई दुर्ग मोहीमचे श्रीदत्त राऊत यांनी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करणार असून त्यानंतरही न्याय न मिळाल्यास आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

ज्यांना दुर्गसंवर्धनाबाबत माहिती, अभ्यास नाही, अशा व्यक्तींना समितीमध्ये देण्यात आल्याचा आरोप राम खुर्दळ यांनी केला आहे. समितीमध्ये नाशिक विभागातील शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे राम खुर्दळ आणि वसई दुर्ग मोहिमेचे श्रीदत्त राऊत यांना सहभागी करावे, असे पत्र सुधीर मुनगुंटीवार यांना देण्यात आले आहे. यावेळी पर्यावरण मित्र अॅड. प्रभाकर वायचळे, दरीमाता पर्यावरणाचे भारत पिंगळे, िशवाजी पिंगळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...