आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:रिअल्टर्स डे निमित्त प्राण तर्फे बुधवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रोफेशनल रिअल्टर्स असोसिएशन नाशिक (प्राण) या संस्थेतर्फे दरवर्षी ७ डिसेंबरला ‘रिअल्टर्स डे’ साजरा केला जाताे. या पार्श्वभूमीवर बुधवारी(दि. ७) एबीएच बिल्डर्सच्या सहयोगाने ‘ब्रोकर की पाठशाला’ चे संस्थापक विनोद ठक्कर रिअल इस्टेट मार्केटिंग या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. गंगापूर राेडवरील ट्री लँड येथे विविध मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे.

रामकृष्ण आरोग्य संस्थेचे प्रमुख स्वामी श्रीकंठानंद यांचेही व्याख्यान हाेणार आहेे. मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे हे स्टॅम्प ड्युटी व नाशिकचा विकास या विषयावर मार्गदर्शन करतील. कार्यक्रमात रिअल इस्टेट क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व रिअल्टर्स, ब्रोकर्स, बिल्डर्स यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष विक्रांत आव्हाड, उपाध्यक्ष प्रदीप रणधीर, सचिव नितीन कोतकर, राज तलरेजा, कैलास कदम यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. यासाठी जगदीश बंग (९९२२६१७४४७),नीलेश येवले ( ९९२२२६३७४४) यांच्याशी संपर्क करावा.

बातम्या आणखी आहेत...