आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीत फेकली मुदतबाह्य औषधे:नंदिनी नदीत फेकली मुदतबाह्य औषधे;विशेष म्हणजे यांत औषधी गोळ्या, सिरींज

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नंदिनी नदीला जोडणाऱ्या कामटवाडे ते शिवशक्ती येथील नाल्याजवळील रस्त्याच्या कडेला गेल्या काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींकडून मुदतबाह्य औषधे फेकली जात आहेत. इतरही काही ठिकाणी सर्रासपणे नागरी वस्तीनजीकच अशाप्रकारे औषधे टाकली जात असल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. विशेष म्हणजे यांत औषधी गोळ्या, सिरींज,

उघड्यावर पडलेल्या या औषधांमुळे मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नसून, याबाबत प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, मुदत संपल्यावर औषधे पुन्हा संबंधित कंपनीकडे नष्ट करण्यासाठी पाठविणे गरजेचे असून, तसे शक्य नसल्यास या मुदतबाह्य औषधांचा कोणी पुनर्वापर करू नये यासाठी ती जमिनीत खोलवर पुरणे गरजेचे असते. तसेच, शहरातील बायोवेस्ट प्रकल्पातही हॉस्पिटलमधून वापरात नसलेली औषधे गोळा करून योग्य पद्धतीने नष्ट केली जातात. शहरातील नंदिनी नदीला जोडणाऱ्या कामटवाडे ते शिवशक्ती येथील नाल्याजवळील रस्त्याच्या कडेलाच काही दिवसांपासून औषधे फेकण्यात येत असल्याचे समोर आले आहे. थेट नागरी वस्तीनजीकच फेकलेल्या या औषधांमुळे लहान मुलांसह इतरांच्याही आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सिरींजच्या वापरामुळे रोगराई
नागरी वस्तीलगत टाकण्यात आलेल्या औषधांत सिरीन, इंजेक्शन्सचाही समावेश असल्याने परिसरातील लहान मुले सर्रासपणे खेळण्यासाठी त्याचा वापर करत आहेत. दुष्परिणामांपासून अनभिज्ञ असलेल्या या मुलांच्या आरोग्यासही मोठा धोका असून, सिरींजच्या वापरामुळे रोगराई पसरण्याचीदेखील शक्यता नाकारता येणार नाही.

अन्यथा आंदोलन करू...
नंदिनी नदीला जोडणाऱ्या कामटवाडे ते शिवशक्ती येथील नाल्याजवळ आज मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे टाकण्यात आलेली आहे, तरी नाशिक महानगरपालिकेने त्वरित दोषींवर त्वरित कारवाई करावी अन्यथा आम्हाला याविरोधात आंदोलन करावे लागेल. - अमित कुलकर्णी,अध्यक्ष, निसर्गसेवक युवा मंच

अन्न व औषध विभागाकडून दुर्लक्ष
मुदतबाह्य संपलेल्या औषधांची विल्हेवाट लावण्यासाठी ड्रग अॅक्ट १९४० प्रमाणे कायदा करण्यात आला आहे. या अॅक्टप्रमाणे जर चुकीच्या पद्धतीने औषधांची विल्हेवाट लावण्यात आल्याचे निदर्शनास आले तर त्याविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येऊ शकते. मात्र, या प्रकरणाकडे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...