आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक अपघात:स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे करताना भूमिगत वीज जोडणीमध्ये स्फोट; कामगाराचे हात भाजले

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक स्मार्ट सिटी रस्त्याचे काम करताना भूमिगत वीज जोडणीमध्ये स्फोट झाल्याने एका कामगाराचे दोन्ही हात भाजल्य़ाची घटना रेड क्रॉस येथे मंगळवार 14 जून रोजी दुपारी उघडकीस आली.

कर्मचारी गंभीर जखमी

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु आहेत. दुपारी रेड क्रॉस सिग्नल येथे रस्त्याचे कामाला सुरुवात करण्यात आली. कामगार खोदकाम करत असताना टिकाव भूमिगत केबलमध्ये घुसल्याने अचानक स्फोट झाला घटनेत एका कर्मचाऱ्याचे दोन्ही हात भाजल्याने तो गंभीर जखमी झाला.

कर्मचाऱ्यावर उपचार सुरु

जखमी कर्मचाऱ्यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कर्मचाऱ्यावर उपचार सुरु आहे. घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी कर्मचारी गोळा झाले होते. मात्र, नेमकी घटना कशामुळे घडली याबाबत ठोस माहिती मिळाली नाही.

नागरिकांची झाली गर्दी

अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात धुराचे लोळ पसरले होते. नेहमीप्रमाणे नागरिकांनी गर्दी झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. घटनेबाबत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे आणि महावितरण कंपनीकडून कुठलेही अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही.

नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

रस्त्यांचे काम सुरू असून पावसाळा सुरू झाला आहे.तरी देखील स्मार्ट सिटी कडून रस्त्यांची कामे पूर्ण होत नसल्याने नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...