आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:केंद्राच्या शिष्यवृत्ती योजनांना 30  नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रशासन पुरस्कृत असलेल्या २०२२ व २०२३ या वर्षातील शिष्यवृत्ती योजनांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण सहसंचालकांनी घेतला आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत असेल. तर महाविद्यालयांनी अर्जांची आॅनलाइन पडताळणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

एन.एस.पी. पोर्टलद्वारे केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना या तीन योजनांची ऑनलाइन पद्धतीने उच्च शिक्षण संचालनालयामार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या सूचनानुसार सन २०२२-२३ साठी केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत कळविण्यात आलेले आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अंतिम दि. ३० नोव्हेंबरपर्यंत आहेत. तर महाविद्यालयांनी अर्जाची ऑनलाइन पडताळणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून अंतिम मुदत १५ डिसेंबर अशी देण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...