आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापदवी परीक्षा आणि त्यांचे निकाल लांबल्याने आता त्याचा मोठा परिणाम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या प्रवेशप्रक्रियेवर होत आहे. १ जूनपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असली तरी, २ ऑगस्ट उजाडल्यानंतरही अपेक्षित संख्येने विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही. परिणामी विद्यापीठावर प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे. आता १६ ते ३१ ऑगस्टदरम्यान विलंब शुल्कासह प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
विशेषत: काम करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे उघडणाऱ्या मुक्त विद्यापीठाचे प्रवेश सुरू होऊन दाेन महिने उलटले आहेत. पण, यंदा अद्याप अपेक्षित प्रवेश होऊ शकलेले नाहीत. गत दोन वर्षांत कोरोनामुळे ऑनलाइन घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकालही ऑनलाइन जाहीर झाले. पण यंदा परीक्षा ऑफलाइन झाल्याने निकालही ऑफलाइनच जाहीर होणार असल्याने प्रवेशप्रक्रियाही रखडली. परिणामी मुदतीत जागा भरण्याची शक्यता कमीच असल्याने प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी लागणार आहे. तसे नियोजनही विद्यापीठाकडून सुरू आहे.
१०२ अभ्यासक्रमांसाठी प्रक्रिया
अद्याप विद्यापीठाचे निकाल जाहीर झालेले नसतानाही दोन महिन्यांपासून प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यामध्ये १०२ अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी अजूनपर्यंत केवळ ७० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.गतवर्षी साडेपाच लाखाहून अधिक प्रवेश झाले होते.
मुदतवाढीसाठी मान्यता गरजेची
ऑफलाइन परीक्षांमुळे निकालास विलंब होत आहे. मात्र प्रवेशप्रक्रिया सुरू असून गॅप पडलेल्या, काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत. प्रवेशासाठी मुदतवाढ देता येईल, पण त्यासाठी शासनाची मान्यता घ्यावी लागेल.
- डॉ. प्रकाश देशमुख, प्रभारी कुलसचिव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.