आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत:बारावीच्या परीक्षा अर्जासाठी 15  नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी आॅनलाइन आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे नियमित शुल्कासह १ ते २१ आॅक्टोबरदरम्यान आॅनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

नियमित शुल्कासह १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. तर विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. कला, वाणिज्य, विज्ञानसह संयुक्त शाखा घेऊन बारावीच्या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयद्वारे ट्रान्सफर आॅफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत सरल डाटाबेसद्वारे प्रचलित पद्धतीने नियमित शुल्कासह भरावयाची आहेत.

बातम्या आणखी आहेत...