आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:दहावीच्या परीक्षा अर्जासाठी 25 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी आॅनलाइन आवेदनपत्रे भरण्याच्या विहित मुदतीत २५ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.नियमित शुल्काने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही बोर्डातर्फे स्पष्ट करण्यात आले होते, माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे १९ आॅक्टोबर तर १० नोव्हेंबर या कालावधीत सरल डाटाबेसवरून भरावयाची आहेत. १० नोव्हेंबर रोजी विहित मुदत संपुष्टात येणार होती.

त्यामुळे त्यात ११ ते २५ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसता येईल.

बातम्या आणखी आहेत...