आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परीक्षा:सेटनंतर नेट परीक्षा अर्जासाठी 15 पर्यंत मिळाली मुदतवाढ

नाशिक10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे विद्यापीठाने काढले प्रसिद्ध पत्रक

सहायक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी स्टेट इलिजिब्लिटी टेस्ट (सेट) परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यस्तरावर सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे केले जाते. यासंदर्भात पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध पत्रक काढले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जानेवारी महिन्यात सेट २०२० परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया राबवली होती. याअंतर्गत इच्छुक पात्र उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी १ जानेवारीला सुरुवात झाली होती. २९ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. १८ जूनला प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) उपलब्ध करून दिले जाणार होते. महाराष्ट्र व गोवा राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे २८ जूनला सेट परीक्षा घेण्याचे नियोजित होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सेट परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तसेच नेट परीक्षाही पुढे ढकलण्याची शक्यता आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या अर्जासाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. या विहित मुदतीत आता १५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या यूजीसी-नॅशनल इलिजिब्लिटी टेस्ट (यूजीसी-नेट) परीक्षा जून २०२० मध्ये घेण्याचे नियोजित आहे. ही परीक्षादेखील आता पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांच्यातर्फे ही परीक्षा घेतली जात असते. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार १६ व त्यानंतर ३१ मेपर्यंत अर्ज भरण्यास अंतिम मुदत होती. परंतु कोरोनामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...