आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा मुदतवाढ:राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 24 जूनपर्यंत मुदतवाढ; 36 जिल्हा केंद्रांवर 21 ऑगस्ट रोजी परीक्षा

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य शासनाच्या एकूण १६१ पदांची भरती होणार असून येत्या २१ ऑगस्ट २०२२ ला राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी १ जून २०२२ ही अंतिम मुदत होती. या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना आता २४ जूनपर्यंत प्रवेश अर्जासाठी संधी आहे. राज्यातील ३६ जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा होणार असून या भरती प्रक्रियेत सर्वाधिक जागा नगरपालिका, नगर परिषदांमधील मुख्याधिकारी आदी पदांच्या आहेत.

या १६१ पदांसाठी भरती
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट- अ (९), मुख्याधिकारी, नगरपालिका, परिषदा, गट- अ (२२), बालविकास प्रकल्प अधिकारी, गट-अ व तत्सम पदे (२८), सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (२), उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (३), कक्ष अधिकारी, गट-ब (५), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब (४) यांसह निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे (८८).

बातम्या आणखी आहेत...