आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हान:भाजप प्रदेश पदाधिकाऱ्याकडून खंडणी उकळणारा जेरबंद, इतर संशयित फरारच

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपा प्रदेश कामगार माेर्चा सरचिटणीस पदावर कार्यरत विक्रम नागरे यांच्याकडून सुमारे १० लाखांची खंडणी घेत त्यांच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अखेर सातपूर पाेलिसांनी मुख्य संशयित राेशन काकड यास अटक केली आहे. याच गुन्ह्यातील आणखी संशयित सराईत गुन्हेगार जया दिवे, दीपक भालेराव याच्यासह सहा ते सात फरार असून पाेलिसांसमाेर त्यांच्या अटकेचे आव्हान निर्माण झाले आहे.

विक्रम नागरे यांच्याकडून खंडणी उकळल्या प्रकरणात पाेलिसांची दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुख्य संशयित रोशन काकडसह अन्य संशयितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. मात्र, न्यायालयात अटकपूर्व जामीन न मिळाल्याने पाेलिसांनी काकड यास ताब्यात घेतले आहे. दीपक भास्कर भालेराव, संजय जाधव, गणेश अशोक लहाने, गौरव ऊर्फ गुलब्या घुगे, अनिरुद्ध शिंदे, जया दिवे आदींनी ठेकेदार नागरे यांच्या घरावर दगडफेक केल्याचा आराेप आहे.

१ जानेवारी २०२० ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत संशयित दीपक भालेराव व रोशन काकड यांनी नागरे यांना त्यांच्या शेताच्या रस्त्यावर अडवून जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी केली हाेती. पाेलिसांनी या प्रकरणात फरार गौरव घुगे, गणेश लहाने यांना दाेनच दिवसांपुर्वी अटक केली हाेती. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील संशयितांची संख्या १५हून अधिक आहे.

माेक्कासाठी हालचाली मुख्य संशयित राेशन काकड, जया दिवे यांच्यासह इतरांविराेधात खून, प्राणघातक हल्ले, खंडणीसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. राज्यात शिंदेसेना-भाजपचे सरकार असल्याने आणि तक्रारदार नागरे हे भाजप पदाधिकारी असल्याने या गुन्ह्यात संशयितांविराेधात माेक्काचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी पाेलिसांकडून हालचाली सुरू असल्याचे सांगितले जाते.

दाेन वर्षांनंतरच्या तक्रारीचे गूढ पाेलिसांकडून या गुन्ह्यात तक्रारदार विक्रम नागरे यांनी तब्बल दाेन वर्षे संशयितांना मागणीनुसार पैसे दिले. त्यावेळी संशयितांचे आणि नागरे यांचे सख्य असताना त्यांनी आताच कशी तक्रार दिली? असा प्रश्नही उपस्थित हाेत असून या तक्रारीवरून पुन्हा एकदा सातपूरमध्ये टाेळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...