आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानीव अभिहस्तांतरण करून देणे गरजेचे:मानीव अभिहस्तांतरणाने फ्लॅट विक्री सुलभ; मानीव अभिहस्तांतरण, पुनर्विकास, अडचणी व नवे नियम याबाबत मार्गदर्शन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इमारत किंवा अपार्टमेंटची नाेंदणी व त्यानंतर मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेन्स) करणे अत्यंत गरजेचे असून फ्लॅटची विक्री करताना ही मालमत्ता तुमचीच असल्याचे यामुळे स्पष्ट हाेते. विकसकानेे इमारत बांधल्यानंतर तीन महिन्यात संस्था नाेंदणी स्वत: करून देणे गरजेचे आहे, मात्र ती केली गेली नसेल तर फ्लॅट धारकांना स्वत: ती करता येते. जर गृहनिर्माण संस्था म्हणून नाेंदणी केली नाही, मानीव अभिहस्तांतरण झाले नसेल तर त्या इमारत किंवा अपार्टमेंटच्या जमीन आणि टेरेस यावर विकसक हक्क सांगू शकताे, असे मार्गदर्शन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी केले.

गृहनिर्माण सोसायटी संदर्भातील मानीव अभिहस्तांतरण, पुनर्विकास, अडचणी व नवे नियम याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक व जिल्हा हाउसिंग फेडरेशन नाशिक आणि ऑडिटर कौन्सिल अॅण्ड वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर शिबिरात खरे बाेलत हाेते. माेकळ्या जागेवर गाळे तर टेरेसवर दाेन चार मजले चढविले जाऊ शकतात. मानीव अभिहस्तांतरण करून घेतल्यानंतर संस्थेच्या मालकीची जमीन हाेते. विकसकने इमारतीतील फ्लॅट विक्री केल्यानंतर तीची नाेंदणी करून देणे आणि त्यानंतर तीन महिन्यांत मानीव अभिहस्तांतरण करून देणे गरजेचे आहेे.

इमारत किंवा अपार्टमेंटबाबत मार्गदर्शक सूचना अशा
फ्लॅटधारकाने मानीव अभिहस्तांतरण करणे फायद्याचे. इमारतीचा पुनर्विकास करताना मानीव अभिहस्तांतरणामुळे अडचणी येत नाहीत.गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमंेट काहीही असाे नाेंदणी फायद्याची. नाेंदणीनंतर मानीव अभिहस्तांतरण केल्याने इमारतीची मालकी हाेते फ्लाॅटधारकांची.

बातम्या आणखी आहेत...