आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारमार्फत जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ज्या-ज्या सुविधा देता येईल त्या पुरवण्यात येतील. खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. सिन्नर येथील सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी लाेकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
उद्योग मंत्री उदय सामंत, माजी आमदार राजाभाऊ वाजे, कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जयंत जाधव, युवा नेते सत्यजित तांबे, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, युवा नेते उदय सांगळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी संचालक हेमंत वाजे, नामकर्ण आवारे, माजी नगराध्यक्ष किरण डगळे, माजी उपसभापती संग्राम कातकाडे, पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे आदी उपस्थित होते.
भुसे म्हणाले की, सिन्नरप्रमाणे युवकांसाठी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात क्रीडा प्रबोधिनी व अभ्यासिके सारखे आदर्श उपक्रम उभे राहिले पाहिजेत. प्रबोधिनीचा खेळाडूंना लाभ होणार असल्याचे सांगितले. सुविधा मिळाल्या तरच उत्कृष्ट क्रीडापटू तयार होतील. उदय सांगळे यांनी खेळाडूंची नेमकी गरज ओळखून चांगले काम उभे केल्याचे ते म्हणाले. माजी आमदार वाजे यांनी अभ्यासिका सुरू करून स्पर्धा परीक्षांसाठी युवकांना संधी उपलब्ध करून दिली आहे. उद्योग मंत्री सामंत यांनी सेझच्या पाच हजार हेक्टर जागेवर नव्याने उद्योग कसे आणता येईल. त्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
उदय सांगळे यांनी सेझचा प्रकल्प सुरू न झाल्याने येथील उद्योगधंद्यांना चालना मिळू शकली नाही. त्यामुळे सेझच्या जागेवर नवीन मोठा प्रकल्प आणावा, अशी मागणी केली. सरकार वेगवेगळ्या उद्योग समूहासोबत करार करत आहे. सेझवर नवीन प्रकल्प आल्यास येथील विकासाला चालना मिळेल. त्या दृष्टीने नवीन उद्योग सिन्नरमध्ये आणावेत, अशी मागणी सांगळे यांनी केली. राजाभाऊ वाजे, जयंत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. किरण मिठे यांनी सूत्रसंचालन केले. बंडूनाना भाबड यांनी आभार मानले.
राजाभाऊ वाजे यांना उपद्रव होऊ देणार नाही उद्योग मंत्री सामंत यांनी राजाभाऊ वाजे यांच्या घरी एकदा जेवण घ्यायला जाणार आहे, असे सांगितले. जेवणाला आल्यामुळे मात्र उपद्रव होऊ देणार नाही याची काळजी घेऊन राजकारण काहीही असो क्रीडा क्षेत्रासाठी ते बाजूला ठेवणे गरजेचे असते, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.