आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांनो, घाबरू नका..! नाराज तर अजिबात होऊ नका. परीक्षेत नापास झालो, अपयश आले म्हणून बिथरून जाऊ नका. तुम्ही परीक्षेत नापास झालात म्हणजे फार मोठा गुन्हा केला नाही. भल्या भल्या नेमबाजांनी सराव करून सुध्दा ऐन स्पर्धेवेळी नेम चुकतो. क्रिकेटमधील नावाजलेले निष्णात खेळाडू पहिल्याच बाॅलवर आऊट होतात. म्हणून ते हार न मानता अधिक जोमाने, ईर्षने तयारी करून यश प्राप्त करतात. विजेच्या बल्बचा संशोधक थाॅमस अल्वा एडिसनने प्रत्येक संशोधन पारखून घेण्याआधी अनेक प्रयोग निष्फळ झाले. वाया गेले. नुकसान झाले. पण त्याने माघार घेतली नाही. संशोधन सुरूच ठेवले.
मोटारीच्या टायरचा जनक "डनलॉप’याने रबराला
पुष्टी मिळावी म्हणून त्यात काय पदार्थ मिसळले हे त्याचे त्यालाच माहीत. पण कणखर रबर टायर बनविण्यात तो यशस्वी झाला. अणुऊर्जाचा जनक अल्बर्ट आइन्स्टाईन हा मॅट्रिकच्या परीक्षेत गणितात नापास झाला. घरचे नाराज झाले. त्याच्या चुलत्याने आइन्स्टाईनला बोटीवर नेले. बोटीवरील कामगारांची मोजणी करायला सांगितले. नंतर त्यांची हजेरी लिहायला सांगितले. नंतर त्यांचा पगार किती होईल ते काम दिले. आइन्स्टाईनने ते केले. मग चुलता म्हणाला कि तुला तर गणित छान जमते. अरे अंकांची आकडेमोड म्हणजे गणित..! ते तर तुला जमते.यानंतर त्याने परीक्षा दिली. पास झाला. पुढे काॅलेजमध्ये गणित विषयात पदवी घेतली.
गणिताची गोडी लागली अन् पुढे त्याने E=Mc2 हे अणुऊर्जाचे जगन्मान्य सूत्र शोधले.रसायनशास्राची निर्मिती तर अतिशय मनोरंजक आहे. माणसाला अमरत्व प्राप्त करण्यासाठी "अमृत’आणि अतिश्रीमंत होण्यासाठी लोखंडाला परीसस्पर्श झाला तर सोने तयार होते, अशा भ्रामक, ऐकीव गोष्टींच्या मागे कांही शास्रज्ञ लागले. यात "अमृत’वा परीस कुणालाही मिळाला नाही. मात्र विविध गुणधर्माची रसायने, पदार्थ तयार झाले. थोडक्यात"अपयशाने खचून न जाता पुन्हा पुन्हा शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले व वेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. आणि यश संपादन केले. म्हणजेच अपयश ही यशाची पहिली पायरीहोऊ शकते’ हे नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले असेलच. इसलिए डरो मत दोस्त..! डर के आगे जीत है..! -पी. व्ही. शिरसाठ, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, नाशिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.