आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल:स्टीलसह चाेरी गेलेला ट्रकचा शाेध लावण्यात यंत्रणेला अपयश

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना येथून स्टील भरलेल्या ट्रकची स्टीलसह चोरी होऊन २० दिवस होऊनही ट्रकचा शोध लागला नसल्याने यंत्रणेच्या तपासावर प्रश्न उपस्थित होत आहे. २८ नोव्हेंबर रोजी धोबीघाट टाकळी रामदास स्वामी पुलाजवळ रस्त्याच्या कडेला उभा केलेला ट्रक स्टीलसह चोरी झाला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास अद्याप लागलेला नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती व चालक वाल्मीक ईपरदास (रा. जोशीवाडा, टाकळी) यांच्या तक्रारीनुसार, एमएच १५ डीके २३५५ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये जालन्याच्या जय हो ट्रान्सपोर्ट येथील एसआरजी कंपनीचे २५ टन स्टील सळई भरून नाशिकला पोहाेचले होते. हा ट्रक टाकळीच्या धोबी घाट येथे रस्त्याच्या कडेला उभा करून ते घरी गेले हाेते.

सकाळी याठिकाणी ट्रक नव्हता. याबाबत तक्रार दिल्यानंतर या गुन्ह्याचा तपास उपनगर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट २ आणि मध्यवर्ती गुन्हे शाखा पथकाकडून सुरू असताना ट्रक पडघा येथे गेल्याचे टोलनाका येथील सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. मात्र येथून पुढे ट्रक कुठे गेला याबाबत तपास थांबला आहे. जालना येथून स्टील भरून देणारे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मुद्दसर शेख यांनी तपासात मदत केली असून वीस दिवसांपासून ते शहरात आहेत.ट्रकचा तपास लागत नसल्याने उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...