आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस यंत्रणेचे दुर्लक्ष:अंडर एज ड्रायव्हिंग रोखण्यास अपयश

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्ते अपघातात अल्पवयीन मुला-मुलींच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असून चार दिवसांपूर्वी शहरातील पाच अल्पवयीन मुलांचा अपघातात बळी गेला. यातील १७ वर्षीय मुलाने आईकडून कारची चावी घेत मित्र-मैत्रिणींसोबत संगमनेरला लग्नाला गेला. परत येताना नियंत्रण सुटल्याने या अपघातात पाच मुले-मुली ठार झाले. या घटनेनंतरही पोलिस यंत्रणेकडून दखल घेतली गेली नाही. रात्रीच्या वेळी अंडर एज ड्रायव्हिंग सुरू असून पोलिस यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

रस्ते अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांकडून हेल्मेटसक्ती कारवाई सुरू करण्यात आली होती. चार दिवस कारवाई झाल्यानंतर पाचव्या दिवशी या कारवाईला ब्रेक लागला. तत्कालीन आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पालकांमध्ये जनजागृती करत अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये याकरिता शाळा-महाविद्यालयांत प्रबोधन केले होते.

मात्र शहरात दुचाकी, कार अपघातात दहा महिन्यांत अल्पवयीन चालकांच्या १८ अपघातांत १५ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. वाढते अपघात रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून ठोस नियोजन केले जात नसल्याने अपघातात वाढ होत आहे.

पालक जबाबदार
अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देण्यास पालक जबाबदार आहेत. पालकांनी मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये. मुलांच्या प्रेमापोटी पालक भावनिक विचार करत वाहन चालवण्यास देत आपल्या पाल्यांना मृत्यूच्या खाईत लोटत आहे.

हेल्मेटसक्ती थंडावली
१ डिसेंबरपासून हेल्मेटसक्ती कारवाई सुरू करण्यात आली होती. अवघे चार दिवस ही कारवाई सुरू राहिली. पाचव्या दिवशी या कारवाईला ब्रेक लागला. यंत्रणेकडून कुठलीही कारवाई व्यापकपणे राबवली जात नसल्याने अपघातात वाढ होत आहे.

बातम्या आणखी आहेत...