आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड:फैज बँक अध्यक्षपदी हाजी सलीम मिर्झा; उपाध्यक्ष शकिल शेख

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक येथील मुस्लिमबहुल सभासद असलेली दि. फैज मर्कन्टाईल को ऑप बँकेच्या अध्यक्षपदी हाजी सलीम मिर्झा यांची तर उपाध्यक्षपदी शकील शेख अविरोध निवड झाली. प्रत्येकी एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षखाली बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

बॅँकेच्या संचालक डॉ. सादीक शेख यांनी अध्यक्ष पदासाठी हाजी सलीम मिर्झा यांचे नाव सुचविले तर अध्यक्षपदाला अनुमोदन म्हणून अत्तार मोसीन हारुण यांनी मंजुरी दिली. उपाध्यक्षपदासाठी डॉ. शेख हिना सादीक यांनी शेख शकील वजीर यांचे नाव सुचविले तर अनुमोदन म्हणून मिर्झा हन्नान सलीम बेग यांनी यांच्या नावाला मंजुरी दिली.

यावेळी बँकेचे नवनिर्वाचित संचालक मंडळातील शेख रफतजहाँ शकील, तडवी आरीफ इब्राहीम, शेख अशपाक शेख लाल, इनामदार वसीम इकबाल, हाश्मी जुबेर फेरोज शेख इम्तियाज मोहम्मद गौस आदी संचालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...