आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:'शासनाकडून माेफत स्मार्टफाेन’चा बनावट मेसेज धाेकादायक, मेसेजमधील लिंकद्वारे माहिती संकलित करून सायबर फसवणुकीचा धाेका

नाशिक / सचिन जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १० नागरिकांना लिंक फाॅरवर्ड करण्यास सांगितले जाते

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालयही मार्चपासूनच लाॅकडाऊन आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्य लक्षात घेता अनेक ठिकाणी आॅनलाइन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. याचाच फायदा घेत ‘आॅनलाइन शिक्षणासाठी शासनाकडून माेफत स्मार्टफाेन मिळणार’ असा साेशल मीडियावर मेसेज पाठवत त्यावरील लिंकद्वारे नागरिकांची सर्व माहिती संकलित केली जात आहे. या संकलित माहितीच्या आधारे सायबर फसवणूक हाेण्याची शक्यता सायबरतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

काेराेनाचा फैलाव राेखण्यासाठी २३ मार्च राेजी लाॅकडाऊन करण्यात आल्याने शाळा-महाविद्यालय अद्यापपर्यंत बंदच आहे. अर्थव्यस्थेेला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अन्य व्यवहार सुरू करण्यात आलेले असले तरी दुसरीकडे शाळा-महाविद्यालय सुरू करण्याबाबत अद्यापपर्यंत काेणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. याचमुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक शाळांनी आॅनलाइन शिक्षणाला सुरुवात केली जात आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या बेताच्या अर्थिक परिस्थितीमुळे स्मार्ट फाेन विकत घेता येत नसल्याचीही बाबदेखील समाेर आली आहे.

याचाच फायदा घेत शासनाच्या वतीने माेफत स्मार्ट दिले जाणार आहे अशी लिंक साेशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. या लिंकच्या आधारे नाव, माेबाइल क्रमांक, पत्ता आदी माहिती संकलित केली जात आहे. या संकलित माहितीद्वारे सायबर फसवणूक हाेऊ शकत असल्याने अशा बनावट लिंकपासून नागरिकानी दूर रहावे, असे आवाहन सायबर पाेलिसांकडून केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

१० नागरिकांना लिंक फाॅरवर्ड करण्यास सांगितले जाते
माेफत स्मार्टफाेनसाठी दिलेल्या लिंकवर सर्व माहिती भरण्यास सांगितले जाते. त्यानंतर तुमच्या नाेंदणीसाठी ही लिंक साेशल मीडियावर १० नागरिकांना पाठविण्यास सांगितले जाते. अशा प्रकारे गेल्या काही दिवसांपासून साेशल मीडियावर शासनाच्या वतीने माेफत स्मार्टफाेनचा मेसेज चांगलाच व्हायरल झाला आहे.

संकलित केलेल्या डाटाचा गैरवापर हाेऊ शकताे
बनावट मेसेजच्या आधारे लिंकच्या माध्यमातून संकलित केलेल्या माहितीचा अर्थात डाटाचा गैरवापर हाेऊ शकताे. बल्कमध्ये असलेली ही माहिती विकली जाते. तसेच यामुळे सायबर फ्राॅडदेखील हाेऊ शकताे. - तन्मय दीक्षित, सायबरतज्ज्ञ

नागरिकांनी सजग राहत फसवणूक टाळावी
विविध प्रकारच्या बनावट लिंकद्वारे सायबर फसवणूक हाेण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा बनावट लिंकपासून नागरिकांनी सजग राहत फसवणूक टाळली पाहिजे.तसेच याप्रकारे काेणाची फसवणूक झाली असल्यास याबाबत पाेलिसांकडे तक्रार करावी. - श्रीपाद पराेपकारी,
पाेलिस निरीक्षक, सायबर पाेलिस