आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया अटकेत:मंत्र्याचा स्वीय सहायक असल्याची थाप; शासकीय नोकरी, टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवत 2 .76 कोटींचा गंडा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्र्याचा स्वीय सहायक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे भासवत ओळखीच्या लोकांना शासकीय नोकरी, विविध टेंडर मिळवून देण्याचे अमिष देत नागरिकांना तब्बल २ कोटी ७६ लाखांचा गंडा घालणाऱ्या तोतया स्वीय सहायकाला अटक करण्यात आली. अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताला गुरुवार दि. ६ रोजी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि अनिल आव्हाड रा. लॅमरोड देवळाली कॅम्प यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ ते २०२३ या कालावधीत संशयित सुशील भालचंद्र पाटील रा. लोचन अपार्टमेंट मधूबन काॅलनी मखमलाबाद नाका या संशयितांने आव्हाड आणि त्यांचे नातेवाईक, मित्र यांना एका मंत्र्याचा स्वीय सहायक असल्याचे भासवत तसेच प्रशासनातील मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगत शासकीय नोकरी, शासनाचे विविध टेंडर आणि विविध कामे देण्याचे अमिष दिले.

संशयिताने मंत्र्यांसोबतचे फोटो दाखवत विश्वास संपादित केला. आव्हाड यांना विश्वास बसल्याने पाटील यांना शासकीय नोकरीसाठी पाटील यास सांगीतले. संशयित पाटील याने आव्हाड यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांकडून वेळोवेळी २ कोटी ७६ लाख रुपये घेतले. बरेच दिवस होऊनही नोकरी लावून देत नसल्याने आव्हाड यांनी पैशांची मागणी केली. संशयित पाटील याने पैसे देण्यास नकार दिला.

अर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली. तक्रारीचे गांभीर्य घेत संशयिताच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बुधवारी रात्री संशयिताला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या विरोधात केली होती तक्रार

संशयित पाटील याने गंगापूर पोलिस ठाण्यात राजस्थानच्या एका माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. अनामत रक्कम घेत जाहिरातीचे टेंडर दिले नसल्याची तक्रार होती. या तक्रारीमुळे पाटील हा चर्चेत आला होता.