आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नावाने बनावट व्हाट्सअॅप अकाउंट उघडून पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस येऊन दाेन दिवस उलटत नाही ताेच आता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या नावेही बनावट व्हाट्सअॅप अकाउंट उघडून पैशांची मागणी केल्याचे संदेश येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा केली आहे.
शुक्रवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वत: शासकीय अधिकारी व त्यांच्या आप्तेष्टांना कळविले की, त्यांचे छायाचित्र असलेला डीपी ठेवून एका व्हाॅट्सअॅपवरून अधिकाऱ्यांना किंवा कुणाला संदेश आला तर त्याकडे दुर्लक्ष करावे. ९३४०२३३४६८ हा मोबाइल क्रमांक वापरणाऱ्या व्यक्तीने संदेश पाठविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
संदेश फसवेगिरीचे
पोलिसांच्या शो'धात तो नंबर गुजरातच्या मुरंबी येथील व्हाॅट्सअॅप वगैरे काहीही न कळणाऱ्या शेतकऱ्याचा निघाला. त्याच्या क्रमांकाचा वापर दुसऱ्याकडूनच कोणी केल्याचा संशय पोलिसांना आहे.
राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.