आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्राईम:उत्तर प्रदेशातील कुख्यात डॉन विकास दुबेचे औरंगाबाद कनेक्शन, झडती सुरू, तीन हजार पोलिसांचे 50 पथक मागावर

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुबे मध्य प्रदेशमधील शेंदवा मार्गे महाराष्ट्रात आला असण्याची शक्यता

उत्तर प्रदेशातील कुख्यात डॉन विकास दुबे याचे नाशिक कनेक्‍शन असल्याची माहिती समोर आली असून उत्तर प्रदेश पोलिसांनी नाशिक आणि औरंगाबाद येथे विशेष झडती सत्र राबवण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. याबाबत नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये कामगार पुरवण्यापासून तर विविध ठिकाणी बंदुकधारी सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ठेका असल्याची माहिती पुढे येत आहे.

नाशिक कनेक्शन मात्र अधिकृत माहिती नाही : दुबेचे मोबाइल लोकेशन मध्य प्रदेशमधील औरेया जिल्ह्यातील मिळाले आहे. तो इटावा, झाशी मार्गाने मध्य प्रदेशमधील शेंदवा मार्गे महाराष्ट्रात आला असण्याची शक्यता असली तरी या बाबत अधिकृत माहिती पुढे आली नाही.

नाशिक पोलिस अनभिज्ञ : दुबेच्या मागावर उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष पथक नाशिकमध्ये दाखल असल्याबाबत अंबड, सातपूर पोलिसांना देखील माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असले तरी ही कारवाई अत्यंत गोपनीय झाल्याची माहिती खुद्द पोलिस सूत्रांनी दिली.

तीन हजार पोलिसांचे 50 पथक मागावर

उत्तर प्रदेशातील ७० जिल्ह्यांसह इतर राज्यात सर्च ऑपरेशन आणि छापेमारी सुरू केली आहे. दुबेच्या मागावर तीन हजार पोलिसांची ५० पथके आहेत. यातील दोन पथक नाशिक व औरंगाबादमध्ये दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser