आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेर्चा:शेतकऱ्यांसह कामगारांचा उद्या दिल्लीमध्ये माेर्चा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कष्टकरी कामगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू), अखिल भारतीय किसान सभा, भारतीय शेतमजूर युनियनतर्फे बुधवारी दिल्लीत देशव्यापी माेर्चाचे आयाेजन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट धोरणामुळे कामगार त्रस्त आहे. दडपशाही कामगार विरोधी कायद्याने बेरोजगारी वाढली आहे. केंद्राच्या जनता विरोधी धोरणांविरुद्ध ५ एप्रिलला दिल्लीत देशव्यापी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डाॅ. डी. एल. कराड यांनी दिली. समान कामास समान किमान वेतन लागू करा, सर्व ज्येष्ठ नागरिकांना १० हजार रुपये पेन्शन द्यावी यासह विविध १८ मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहे.