आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी अडचणीत सापडलाय:बाजारभावातील कांदा घसरण थांबवण्यासाठी उपाययोजना करा, भुजबळांचे शिंदे-फडणवीसांना पत्र

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांदा बाजार भावातील घसरण थांबविण्यासाठी राज्यशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे.

छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकविणारे राज्य असुन भारतातील एकुण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा 33 टक्के वाटा आहे. महाराष्ट्रातील सरासरी उत्पादन इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. शिवाय येथील कांद्याची प्रत चांगली असल्याने निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर, सातारा, अहमदनगर, धुळे, बुलढाणा आणि जळगाव जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असुन महाराष्ट्रातील एकुण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा 29 टक्के वाटा आहे. मात्र असे असतानाही शेतकऱ्यांना याचा फायदा होतांना दिसत नाही.

नाशिकचे लासलगांव मार्केट

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कांदा शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठ लासलगांव बाजार समिती ही आशिया खंडात प्रसिध्द अशी बाजारपेठ आहे. येथे विक्रीस येणाऱ्या एकुण आवकेपैकी 85 ते 90 टक्के आवक ही कांद्याची असते. सर्वसाधारणपणे हा कांदा नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार व औरंगाबाद या सहा जिल्ह्यातून विक्रीस येतो. आलेल्यापैकी 70 ते 80 टक्के कांदा हा निर्यातयोग्य असतो. नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह इतर सर्व बाजार समित्या या प्रायमरी मार्केट असल्याने येथे फक्त शेतकरी बांधवांचाच शेतीमाल विक्रीस येतो.

जागतिक निर्यात ठप्प

  • सद्यस्थितीत रब्बी हंगामात कांद्याची विक्री सर्वसाधारण सरासरी 800 प्रती क्विंटलप्रमाणे होत आहे. बाजारभाव स्थिर असल्याने सध्या मिळत असलेल्या बाजारभावात येथील शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च मिळणेही अवघड झाले आहे.
  • तसेच यावर्षी गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यांसह महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर या जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी घटली आहे.
  • बांग्लादेशने कांदा आयातीवर निर्बंध टाकलेत. श्रीलंकेत आर्थिक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याची निर्यात ठप्प झालेली आहे.
  • भारताच्या या दोन्ही प्रमुख आयातदार देशांमध्ये भारतीय कांदा निर्यात होत नसल्याने मागणी अभावी कांद्याची बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे.

या उपाययोजना करा

  • सध्या बाजार समित्यांमध्ये विक्रीस येत असलेला रब्बी कांदा जास्तीत जास्त प्रमाणात परदेशात निर्यात होण्यासाठी कांदा निर्यातीस चालना देण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
  • कांदा निर्यातदारांकरीता केंद्र शासनाने यापूर्वी लागू केलेली 10 % कांदा निर्यात प्रोत्साहन योजना 11 जून 2019 पासुन बंद केलेली योजना पुन्हा सुरू करण्यात यावी.
  • बांग्लादेशला कांदा निर्यात पुर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने निर्णय घ्यावा.
  • कांदा निर्यातदारांना किसान रेल अथवा त्या धर्तीवर व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र रेल उपलब्ध करून दिल्यास माल 48 ते 60 तासांमध्ये पोहोचविला जाईल.
  • कांदा निर्यातीस अडथळा निर्माण होत असल्याने त्वरीत कंटेनर उपलब्ध व्हावे या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...