आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओझर @ 6.0 अंश:नाशिकमध्ये हाडे गोठवणारी हुडहुडी; द्राक्षासह शेतपिकांना थंडीचा फटका

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाचे चक्र बिघडल्याचा मोठा फटका शेतीला बसला असून, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. निफाड तालुक्यात गेल्या आठवड्यापासून वातावरण झालेल्या बदलांमुळे द्राक्ष उत्पादकांसह शेतकरीवर्ग धास्तावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

थंडीने हंगामातील निचांक गाठला

निफाड तालुक्यात ओझर येथील एच.ए.एल येथिल एअर ट्राफिक कंट्रोल येथे 6.0 अंश इतकी नोंद झाली आहे. थंडीने या हंगामातील निचांक गाठला आहे.या कडाक्याच्या थंडीने द्राक्षबागांवर विपरित परिणाम होण्यास सुरवात झाली आहे.काही द्राक्षबागांवर पाने करपली आहे. थंडीचा पारा घसरल्याने परिपक्व द्राक्षमणी तडकुन मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान सदरचे तापमान हे कोणत्याच पिकाला चांगले नाही. या तापमानामुळे द्राक्षबागेत केवळ द्राक्षांनाच नव्हे तर द्राक्षवेलीतील पेशींनाही जखमा होण्याचा धोका आहे.

शेतकरी चिंतेत

द्राक्षबागांना ठिबकद्वारे पाणी देणे गरजेचे असते मात्र भारनियमनाच्या त्रासाने तेही शक्य होत नसल्याचे द्राक्षबागायदार शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या ओझर,पिंपळगाव, उगांव,शिवडी सोनेवाडी भागात द्राक्षबागांत दवबिंदुंची बारिक बर्फाची झालरं तयार झाली होती. तापमानाचा पारा बराच खाली घसरू लागल्याने बागेतील द्राक्षमणी तडकू लागतानाच द्राक्षांच्या घडांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने द्राक्षउत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

द्राक्षबागा संकटात

थंडीमुळे द्राक्षघडांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन शेतकरी बागांवर बुरशीनाशक रासायनिक औषधांची फवारणी करताना दिसत आहेत. एकंदरीत सध्याच्या थंडीने द्राक्षबागा संकटात सापडल्या असून, तापमानाचा पारा येत्या काही दिवसात अधिकच खाली घसरला गेल्यास शेतकऱ्यांसमोरचं संकट अधिकच वाढणार आहे. थंडीच्या काळात द्राक्ष उत्पादकांनी आपल्या बागेला दिवसाऐवजी रात्रीच्या वेळेस जास्तीचे पाणी द्यावे. द्राक्षबागेत धूर करावा, जेणेकरून तापमानात वाढ होताना बागांना ऊब मिळेल.

- प्रकाश पगार, कृषी सल्लागार

बातम्या आणखी आहेत...