आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावांमध्ये वीजपुरवठाही खंडित‎:शहरालगतचे शेतकरी आंदाेलनाच्या पवित्र्यात‎

सिडको‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरालगतच्या परिसरातही दोन‎ दिवसांपासून झालेल्या अवकाळी‎ पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने‎ प्रशासनाने पंचनामे करून नुकसान‎ भरपाई द्यावी , अन्यथा आंदाेलनाचा‎ इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.‎ अंबड, चुंचाळे, विल्होळी, पाथर्डी,‎ वडनेर, पिंपळगाव, दाढेगाव, रायगड‎ नगर परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो‎ रुपयांचे नुकसान झाले आहे. रब्बी‎ हंगामातील द्राक्ष, कांदा, गहू, टाेमॅटाे‎ यासारख्या पिकांचे मोठे नुकसान‎ हाेऊन उभी पिके अक्षरशः शेतात‎ झोपली गेली आहेत.

द्राक्षाच्या घडाला‎ लावलेले पेपर फाटल्याने द्राक्ष मण्यांना‎ तडे गेले. आहेत. काही शेतकऱ्यांचा‎ माल तर दोन ते चार दिवसात व्यापारी‎ नेणार होते. पण गहू, पिका बरोबर‎ टोमॅटो, कोथिंबिर, मेथी, इतर‎ पालेभाज्याही भुईसपाट झाल्याने‎ लाखाेंचे नुकसान झाले आहे.‎ प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून‎ भरपाई द्यावी अशी मागणी मनोहर‎ भावनाथ, रंजन कदम, त्र्यंबक कोंबडे,‎ बंडू धोंगडे, धनंजय गवळी, विष्णू‎ कोंबडे, अंबादास जाचक, सदाशिव‎ जाधव, विश्वनाथ मुंडे आदींनी केली‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...