आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:शेती करण्याचा वाद; मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलोपार्जित शेती करण्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाचा डोक्यात टिकाव मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार जलालपूर शिवारात गुरुवारी (दि. १६) घडला. रात्री ९ वाजता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तालुका पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. बळवंत कोंडाजी शेळके (५७) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

संशयित श्रीहरी कोंडाजी शेळके, जयदीप श्रीहरी शेळके यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. अक्षय शेळके (रा. यशंवतनगर) यांच्या फिर्यादीनुसार त्यांची जलालपूरला वडिलोपार्जित शेती आहे. मोठा भाऊ संशयित श्रीहरी कोंडाजी शेळके (६०) हे ही शेती करतात. मयत बळवंत शेळके आणि त्यांचे भाऊ कुटुंबीयासह शेतावर गेले असता मोठा भाऊ संशयित श्रीहरीने दोघा भावांना शेती करण्यास मज्जाव केला. यातून वाद झाला. संशयित श्रीहरी, त्याचा मुलगा जयदीप आणि पत्नी सुमन यांनी बळवंत शेळके यांच्यावर हल्ला केला. एकाने बळवंत यांच्या डोक्यात टिकाव मारल्याने ते गंभीर जखमी झाले. खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना मृत्यू झाला. बळवंत शेळके हे इरिगेशन विभागात शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आहे.

बातम्या आणखी आहेत...