आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थात सिटीलिंकतर्फे सिन्नर व पिंपळगाव या मार्गावर जलद बससेवेचा प्रारंभ केला आहे.
सिन्नर तसेच पिंपळगाव येथून दररोज अनेक कर्मचारी नाशिकला अपडाऊन करत असतात. अशा कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मार्ग क्र. १४६ ए सिन्नर ते निमाणी जलद बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी ९ वाजता या मार्गावर सिन्नर तहसील कार्यालयापासून सिन्नर एमआयडीसीपर्यंत सर्वसाधारण थांबे देण्यात आले आहे. त्यानंतर ही बस थेट नाशिकमधील बिटको येथे थांबा घेईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी उपनगर, द्वारका, शालिमार, सीबीएस, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी, निमाणी याठिकाणी बस थांबा घेईल. निमाणी ते सिन्नर सायंकाळी ८.३० वाजता ही बस निमाणी, पंचवटी, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, सीबीएस, शालिमार, द्वारका, उपनगर, बिटको येथून थेट सिन्नर येथे पोहोचेल.
पिंपळगाव ते नवीन सीबीएस, सकाळी ९.१५ वाजता ही बस पिंपळगाव वणी चौफुली ते पिंपळगाव मार्केट यार्ड दरम्यान सर्वसाधारण थांबे घेऊन थेट नाशिकमधील औरंगाबाद नाका येथे पोहोचेल. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी निमाणी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा येथे थांबा घेऊन नवीन सीबीएस येथे पोहोचेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.