आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Father And Son Who Beat Up The Watchman Due To A Minor Dispute As To Why The Parking Light Was Not Turned Off, Will Be Jailed For 6 Years

पिता पुत्रास 6 वर्ष कारावास:पार्किंगची लाईट बंद करण्यावरून किरकोळ वादातून वॉचमनला झाली होती मारहाण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इमारतीच्या पार्किंगची लाईट बंद का केली नाही म्हणून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण कर गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यात पिता पुत्राला न्यायालयाने 6 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवली. सिताराम विठ्ठल साबळे (वय 58), संदीप सिताराम साबळे (वय 25, रा. मिलिंद नगर, तिडके काॅलनी) असे शिक्षा झालेल्या बापलेकांची नावे आहेत.

शुक्रवार (ता. 2) रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.एम.गादिया यांच्या न्यायालयाने ही शिक्षा ठोठवली. अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, 8 मार्च 2014 रोजी सकाळी 6.30 वाजता बाफणा हाऊस गायकवाड नगर येथे हा प्रकार घडला होता. या इमारतीमध्ये परमेश्वर राजाराम खंदारे (वय 23) वाॅचमन म्हणून कामास आहे. संशयित आरोपी यांना वाॅचमन खंदारे यांना तु पार्किंगची लाईट का बंद केली नाही, या कारणावरुन कुरापत काढून लाकडी काठीने बेदम मारहाण केली.

ब्लेडने खंदारे यांच्या डाव्या खांद्यावर वार करुन डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण करत गंभीर जखमी केले होते. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपनिरिक्षक रमेश पवार यांनी आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा केले. गुन्हा शाबीत होण्याच्या दृष्टीकोणातून तपास करत आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने आरोपींच्या विरोधात फिर्यादी, साक्षीदार पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरुन ६ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवली.सरकारपक्षाकडून अ‌ॅड. एस. आर.सपकाळे यांनी कामकाज पाहिले. पैरवी व्ही.पी.पाटील, बी. आर. कापडणीस यांनी पाठपुरावा केला.

किरकोळ वादातून मारहाण

आरोपींनी वाॅचमनला किरकोळ कारणांतून गंभीर दुखापत केल्याचे सरकारपक्षाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या खटल्यात फिर्यादी, साक्षीदारांची साक्ष आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे महत्वाचे ठरले. न्यायालयाने आरोपीच्या विरोधात असलेल्या सबळ पुराव्यास अनुसरुन शिक्षा ठोठवली.

बातम्या आणखी आहेत...