आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचा निकाल:पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेची शिक्षा

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधाम बापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली. गुरुवार (दि.23) रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने हा महत्वपुर्ण निकाल दिला. राजु सिताराम आहिरे (वय 40) रा. फुलेनगर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, फुलेनगर मायको दवाखान्याजवळ आरोपी राजु आहिरे हा पत्नी व पीडित अल्पवयीन मुलीसोबत वास्तव्यास आहे. 9 एप्रिल 2021 रोजी पत्नी कामावर गेल्यानंतर घरात एकटी मुलगी झोपलेले असताना आरोपीने मुलीचा गळा दाबन जीवे मारण्याचा प्रयत्न करत तीच्यावर बलात्कार केला.

पत्नी घरी आल्यानंतर मुलीने अत्याचाराची माहिती दिली. पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपनिरिक्ष धनश्री पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला. आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळे करुन गुन्हा शाबित होण्याच्या दृष्टीकोनातून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.व्ही.भाटीया यांनी आरोपी विरुद्ध साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरुन बलात्काराच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठवली. सरकारपक्षा तर्फे अ‌ॅड.रेवती कोतवाल यांनी कामकाज पाहिले. पैरवी एम.एम.पिंगळे, डी.डी कडवे यांनी पाठपुरावा केला.

पीडित मुलीची साक्ष ठरली महत्वाची

पीडित मुलीने न्यायालयात झालेल्या अत्याचाराची दिलेली माहिती. पंच साक्षिदार आणि तक्रारदारांची साक्ष या खटल्यात महत्वपुर्ण ठरली. अ‌ॅड.कोतवाल यांनी 10 साक्षीदार तपासले.