आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गुंतवणुकीसाठी भारतात पोषक स्थिती ; अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंह संधू यांचे प्रतिपादन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत एक नव सामर्थ्यशाली देश म्हणून पुढे येत असून भारतात गुंतवणुकीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था व स्थित प्रशासन यामुळे भारतात उद्योग वाढ वेगाने होत आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंह संधू यांनी केले. राज्यातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांची शीर्ष संघटना असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे भारत-अमेरिका व्यापारवृद्धीसाठी इंडिया-यूएसए डेव्हलपमेंट फोरम स्थापन करण्यात आला असून या फोरमच्या बोधचिन्हाचे वॉशिंग्टन डीसी येथील इंडिया हाऊस येथे अनावरण करून या फोरमचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी संधू बोलत होते. ललित गांधी, उमेश दाशरथी, भाऊसाहेब, कालवाघे, मयंक गुप्ता, नितीन इंगळे उपस्थित होते.

अमेरिकेतील भारतीय दूतावासातर्फे आयोजित समारंभास ललित गांधी व महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. अमेरिकेतील व्यावसायिक आणि उद्योजकांना संबोधित करताना चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध आहेत त्याचा अमेरिकेतील गुंतवणूकदार व उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे सांगून अमेरिकेच्या राजधानीत भारतीय दूतावासात संपन्न होत असलेल्या भव्य समारंभात सहभागाची आणि म्हणणे मांडण्याची संधी मिळणे हा आपला विशेष गौरवपूर्ण सन्मान असल्याचे समजतो. भारतात नवनवीन संधी उपलब्ध हाेत असून दाेन देशांतील संवाद व्यापार वाढीसाठी पाेषक असताे, असे यावेळी गांधी यांनी बोलताना नमूद केले. इंडिया-यूएसए डेव्हलपमेंट फोरमचे पदाधिकारी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे सदस्य माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

व्यापारवृद्धीसाठी इंडिया-यूएसए फोरमची भूमिका महत्त्वपूर्ण
तरणजित सिंह संधू म्हणाले की, भारत-अमेरिका या दाेन बलाढ्य देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापारवृद्धीसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा इंडिया-यूएसए डेव्हलपमेंट फोरम महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. इंडिया-यूएसए डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ च्या प्रयत्नांना भारतीय दूतावास व अमेरिकेतील सर्व कॉन्सुलेट जनरल कार्यालये सक्रीय सहकार्य करतील.

बातम्या आणखी आहेत...