आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक त्रस्त‎:वडाळागाव, डीजीपीनगरसह अशोका‎ मार्गावर माेकाट कुत्र्यांची दहशत‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचा‎ सुळसुळाट झाला असून अनेकांना या कुत्र्यांनी‎ चावा घेतला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना ‎ ‎ मोकाट कुत्री पकडण्याबाबत अद्याप जाग येत ‎नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले‎ जात आहे. अशोका मार्गावर कुत्र्यांची संख्या‎ प्रचंड वाढली असून याबाबत नागरिकांनी‎ केलेल्या तक्रारींकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले‎ जात असल्याचे चित्र आहे.‎ शहरातील वडाळागावासह डीजीपीनगर, ‎अशोका मार्ग, पखालरोड, वडाळारोड भागात‎ काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांमुळे ज्येष्ठांसह ‎लहान मुले जखमी झाल्याच्या घटना घडल्या ‎आहेत.

मात्र, महापालिका कर्मचाऱ्यांना यांना‎ त्याचे साेयरसूतक नसल्याचे दिसून येत आहे. ‎ ‎ महापालिकेच्या पूर्व विभागात कुत्रे पकडण्याची ‎ ‎ मोहीम अनेक दिवसांपासून ठप्प झालेली आहे.‎ या परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण‎ झाले असून परिसरात फिरणेही मुश्कील झाले‎ आहे. वडाळागावातील तैबानगर, खोडेनगर,‎ अशोका मार्गावरील जयहिंद कॉलनी,‎ ममतानगर, फातेमानगर, सॅक्रेट हार्ट शाळा‎ परिसरातील नागरिक भटक्या कुत्र्यांचा वावर‎ असल्याने त्रस्त झाले. पायी चालणाऱ्या‎ ज्येष्ठांसह नागरिकांना या कुत्र्याने चावा घेतला‎ आहे. महिला व लहान मुलांच्या मागे ते‎‎ ‎लागतात, त्यामुळे अपघात होत आहे.‎ निर्बीजीकरण केलेले मोकाट कुत्र्यांचे प्रमाण‎ यात जास्त आहे. या भागात दररोज नागरिक‎ ये-जा करीत असतात. नाइट शिफ्टसाठी जाणारे‎ व येणारे कामगार यांच्या अंगावर हे कुत्रे‎ धावतात. तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांना‎ मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागतो. या‎ कुत्र्यांचा मोठ्या माणसाबरोबरच लहान‎ मुलांनाही त्रास होत आहे.‎

बंदाेबस्त करण्याकडे दुर्लक्ष‎
वडाळागावासह डीजीपीनगर, अशोका मार्ग,‎ पखालरोड, वडाळारोड भागात मोकाट‎ कुत्र्यांचा त्रास गेली वर्षभर होतो आहे.‎ याबाबत अनेकदा तक्रारी करूनही‎ महापालिकेच्या विभागीय कार्यालयाने मोकाट‎ कुत्र्यांवर कारवाईकडे दुर्लक्ष केले‎ आहे.अनेकदा कुत्र्यांमुळे अपघात व चाव्याचे‎ प्रकार होऊनही महापालिकेकडून कारवाई‎ केली जात नसल्याचे चित्र आहे.‎

बातम्या आणखी आहेत...