आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Fear Of Wasting Year Demands Postponement Of CET Exam; Embarrassment Among Students; Law CET, University Examination On The Same Day| Marathi News

परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी:वर्ष वाया जाण्याची भीती सीईटी परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी; विद्यार्थ्यांसमाेर पेच; लाॅ सीईटी, विद्यापीठ परीक्षा एकाच दिवशी

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू असून येत्या ३ ऑगस्टला अंतिम वर्षाची परीक्षा आ णि विधी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा एकाच दिवशी व एकाच वेळेत येत असल्याने विद्यार्थ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आ हे. पुणे विद्यापीठाच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी लाॅ सीईटीसाठी अर्ज केले आ हे. त्यामुळे या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आ ल्याने विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला असून विद्यापीठ परीक्षेला हजेरी लावल्यास सीईटी परीक्षेला मुकावे लागणार आ हे. त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात १४ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहे. या सीईटी परीक्षांच्या तारखाही जाहीर झालेल्या आ हेत. तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी. ए., बी. काॅम. व बी. एस्सी. या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आ हेत. येत्या ३ ऑगस्टला सकाळी ९ ते ११ या वेळेत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा आहे. त्याच दिवशी आ णि त्याच वेळेत म्हणजे सकाळी ९ ते ११ या वेळेत लाॅ अभ्यासक्रमाचीही सीईटी परीक्षा होणार आ हे. पदवीच्या अंतिम वर्षाच्या अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेली असल्याने या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षा कक्षाकडून लाॅ सीईटी पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात
आहे.
सीईटी पुढे ढकला, अन्यथा विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या दिवशीची सीईटी परीक्षेचा पेपरही त्याच दिवशी घेतला जाणार आ हे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आ ल्याने पेच निर्माण झाला आ हे. अनेक विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी नोंदणी केली आ हे. सीईटीविना प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल. त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. जेणेकरून वर्ष वाया जाणार नाही.
- गाैतमी धिवरे, विद्यार्थिनी

८० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची सीईटीसाठी नोंदणी
पदवी अभ्यासक्रमानंतर तीन वर्षांच्या लॉ अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असते. यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांपैकी तीन वर्ष लाॅ सीईटीसाठी ८० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील नाशिक, नगर व पुणे या जिल्ह्यांतील चार ते पाच हजार विद्यार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षेला प्रविष्ट आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी नोंदणी केली आहेत. त्यामुळे एकाच दिवशी दोन परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता असल्याने सीईटी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी आहे

बातम्या आणखी आहेत...