आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:सावकाराच्या जाचाला कंटाळून दांपत्याची गळफास घेत आत्महत्या

इंदिरानगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावकाराच्या जाचाला कंटाळून नवविवाहित जोडप्याने गळफास लावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार महामार्गावरील एका सोसायटीमध्ये उघडकीस आला. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कर्जबाजारीपणा अणि दोघा सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाथर्डी फाटा परिसरातील नयनतारा गोल्ड येथे राहणारे गौरव जितेंद्र जगताप (२९) व नेहा गौरव जगताप (२३) या दोघा दांपत्यांचे मृतदेह फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले होते. साडेसहा लाखांची आर्थिक फसवणूक झाल्यानंतर संशयित युनूस मनियार अणि मयूर बैरागी या दोघांकडून सारखे फाेन येत हाेते.

या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या दांपत्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. याप्रकरणी यश जगताप (रा. राणा प्रताप चौक, सिडको) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. इंदिरानगर पोलिसांनी दोघां‌चे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. खासगी दाेघा सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल तपास सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

अशी घडली होती घटना यश जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भाऊ गौरव जितेंद्र जगताप आणि त्यांची पत्नी नेहा जगताप यांना मावशी चित्रा यांनी फाेन केला. दोघांनी काॅल घेतला नाही म्हणून नेहा फाेन का उचलत नाही, ते बघण्यासाठी खातरजमा करण्यात आली. यश जगताप हे घरी गेल्यानंतर दरवाजा आतून बंद होता. त्यांनी ही बाब काका अरुण गवळी यांना फोन करून सांगितली. संशय बळावल्याने इमारतीमधील रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडला असता गौरव आणि नेहा यांनी हाॅलमध्ये सिलिंग फॅनच्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आत्महत्येचे नेमके कारण समजले.

बातम्या आणखी आहेत...