आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik Municipal Corporation Deforestation, Proposal For 332 Tree Felling In Nashik Has Been Pending For 3 Months; The Problem Of Dangerous Trees In The Rainy Season Is Serious

महापालिका करतेय काय?:नाशिकमध्ये 332 वृक्षतोडीचे प्रस्ताव 3 महिन्यांपासून पडून; पावसाळ्यात धोकादायक झाडांचा प्रश्‍न गंभीर

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक येथील महापालिका क्षेत्रामध्ये मोकळे भूखंड, नवीन बांधकामाच्यादृष्टीने मंजूर केलेले लेआउट तसेच रस्ते किंबहुना सरकारी प्रकल्पांसाठी अडसर ठरणारे जवळपास ३३२ वृक्षतोडीचे प्रकरण १५ मार्च रोजी वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त झाल्यामुळे रखडले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक झाडांचा प्रश्न गंभीर झाला आहे.

उद्यान विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे तसेच लोकप्रतिनिधी व तज्ज्ञ संचालकांशी संबंधित समिती अस्तित्वात नसल्यामुळे तूर्तास धोकेदायक झाडांना पहिल्या टप्प्यात परवानगी दिली जात असून, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये खरोखरच वृक्षतोडीची गरज आहे की नाही याची पाहणी करून संबंधित प्रकरणांना मंजुरी देण्यासाठी आयुक्त रमेश पवार यांनी फास्ट ट्रॅकवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

अन् समिती बरखास्त

नाशिकमध्ये सरकारी व खासगी मोठ्या प्रमाणामध्ये भूखंड असून याठिकाणी अत्यंत पुरातन अशा वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, यातील काही भूखंड हे कालांतराने इमारत बांधकाम वा अन्य प्रयोजनासाठी विकसित करावे लागतात. पर्यायाने, या ठिकाणी लावलेली झाडे तोडण्याची गरज भासते. अशा वेळी महापालिका क्षेत्रामध्ये कोणतेही झाड तोडण्यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेणे क्रमप्राप्त ठरते. वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेता परस्पर वृक्षतोड केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसोबत फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे. प्रशासनामार्फत चुकीच्या पद्धतीने वृक्षतोडीला मान्यता मिळू नये यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीवर लोकनियुक्त सहजतेने निवडल्या जाणाऱ्या नगरसेवकांपैकी जवळपास सात जणांची संचालक म्हणून नियुक्ती केली जाते. त्यामुळे वृक्ष प्राधिकरण समितीवर प्रस्ताव आल्यानंतर बराच वेळा नगरसेवकांकडून स्थळ पाहाणीच आग्रह धरला जातो व प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर गरज असल्यास वृक्षतोडीला परवानगी दिली जाते. त्यामुळे अशी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली वृक्ष प्राधिकरण समिती नगरसेवकांचा कार्यकाळ १५ मार्च रोजी संपुष्टात आल्यानंतर बरखास्त झाली आहे.

प्रकरणांचा वेग वाढला

आता या समितीचे सर्व अधिकार आयुक्त व उद्यान विभागाकडे आले असून दुसरीकडे नगरसेवकांचा संबंध संपुष्टात आल्यामुळे प्रकरणांचा वेग वाढला आहे. गेल्या तीन महिन्यात जवळपास ४५९ वृक्षतोडीसाठी परवानगीचे अर्ज उद्याने विभागाकडे आले. त्यापैकी १२७ झाडे पूर्णतोडीसाठी होती तर उर्वरित ३३२ छाटणीसाठी होती. पहिल्या टप्प्यात पूर्ण तोडीसाठी असलेल्यापैकी जे वृक्ष धोकेदायक आहेत, त्यांना मान्यता देण्यात आली.

धोकेदायक वृक्षतोडीस मान्यता

पावसाळ्यात धोकादायक वृक्ष पडून जीवित हानी होण्याची भीती लक्षात घेता उद्यान विभागाने अपुरे मनुष्यबळ असतानादेखील युद्धपातळीवर काम करून १२७ पैकी ५३ धोकादायक झाडे निश्चित केली. त्यापैकी ४३ झाडांना परवानगी १३ मे रोजीच मान्यता दिली असून, उर्वरित १० मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत. छाटणीसाठी आलेल्या ३३२ वृक्ष सरकारमान्य बाबत लवकरच उद्या निरीक्षकांमार्फत पाहणी करून अहवाल घेतले जातील व त्यानंतर परवानगी दिली जाईल अशी माहिती उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...