आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:विनापरवानगी 28 वृक्षांची ताेड; पालिका आक्रमक

सातपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या गट नं. ४७७ मधील प्लॉट नं. ७ या मोकळ्या प्लॉटवरील २८ वृक्षांची विनापरवानगी कत्तल करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. नागरिकांनी मनपाकडे तक्रार केल्यानंतर उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी प्लॉट मालकाला नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयातील उद्यान विभागात पर्यावरणप्रेमी वैभव देशमुख यांनी वृक्षतोड झाल्याची तक्रार केली होती. त्यानुसार उद्यान निरीक्षक राजेंद्र सोनवणे, भविष्या निकम, जगदीश लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देत तोडलेल्या वृक्षांचा पंचनामा केला. या अवैध वृक्षतोडीत २८ काटेरी बाभूळ व बोराची काटेरी प्रजातीच्या पूर्ण वाढ झालेले वृक्ष विनापरवानगी बुंध्यापासून तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.

महापालिका उद्यान विभागाने जागामालकाचा शोध घेतला असून त्यांना बुधवारी (दि. ४) कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर परवानगी न घेता वृक्षतोड केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...