आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहिल्या महिला कॅन्सर सरवायव्हर व पॉवर लिफ्टर डॉ. नमिता परितोष कोहोक यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे झालेल्या स्टेट पाॅवर लिफ्टींगमध्ये बेस्ट बेचप्रेस व बेस्ट डेड लिफ्टसाठी दाेन सुवर्ण पदक मिळवून ‘महाराष्ट्रच्या स्ट्रॉंग वुमन २०२२’ हा किताब पटकावला.
अमळनेर येथे आयाेजित करण्यात आलेल्या पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३०० हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात मास्टर गटात नाशिकचे प्रतिनिधित्व डॉ. नमिता कोहोक यांनी केले. मास्टर कॅटेगरी मध्ये त्यांनी अमेटेउर पॉवरलिफ्टिंग अससोसिएशन, अफिलिएटेड युनिट ऑफ वर्ल्ड पोवारलिफ्टिंग इंडिया, रेकॉग्निज्ड बाय वर्ल्ड पाॅवारलिफ्टिंग मध्ये अथक परिश्रम व चिकाटीच्या जोरावर २ सुवर्ण पदकांची कामगिरी केली. पहिल्या भारतीय कॅन्सर सरवायव्हर महिला असलेल्या काेहाेक यांच्यावर आठ महिन्यांपुर्वीच माेठी शस्त्रक्रिया झाली हाेती. त्यानंतर त्यांनी ‘महाराष्ट्रच्या स्ट्रॉंग वुमन २०२२’ ची स्पर्धा जिंकून अभिमानास्पद कामगिरी केली.
नियमित पाॅवर लिफ्टींगच्या प्रशिक्षणामुळे त्यांना स्पर्धा जिंकणे शक्य झाले. डॉ.नमिता ह्यांचे बॉडी वजन ५० किग्रॅ असून त्यांनी बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट मिळून एकूण १२० किग्रॅ वजन उचलले. शिस्तबद्ध प्रॅक्टिस व आहारावर त्यांनी वर भर दिला. त्यांच्यामुळे फक्त नाशिकचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली.
ध्येय निश्चिती असल्यास सर्व शक्य
ध्येय निश्चित केल्यास अशक्य काहीच नाही. माझ्या परिवाराची साथ व गुरूंच्या याेग्य मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले असून त्यांचे आभार शब्दात मानणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया डाॅ. नमिता काेहाेक यांनी व्यक्त केली.
अमेरिकेतही उंचावले हाेते भारताचे नाव
काेहाेक यांनी अमेरीकेतही भारताचे नाव उंचावले हाेते. त्यांना ग्लाेबल युनाइटेड लाइफटाइन क्वीन चा किताब मिळाला हाेता. २०१७ मध्ये हा किताब मिळाला हाेता. हा पुरस्कार पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या हाेत्या. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.