आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमध्ये दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज गंगापूर रोडवरील पाइपलाइन रोडवर घडला. पवन नथू पगारे असे मृत तरुणाचे नाव आहे.
कशी घडली घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेदहा वाजता पाइपलाइन रोडवर दोन तरुण एकमेकांशी भांडण करत असल्याचे निदर्शनास आले. काही वेळात संशयिताने पगारेवर चाकूने हल्ला केला. पोटात, छातीत चाकू लागल्याने तो लगेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ल्यानंतर संशयित चाकू घेऊन पळून जायच्या प्रयत्नात होता.
महिला पोलिसाशी झटापट
संशयिताने पळून जायचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हाच महिला पोलिस कर्मचारी शारदा खैरनार या पोलिस ठाण्यात जात होत्या. त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी तत्काळ संशयिताच्या मागे पळून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. संशयिताने त्यांच्याशी झटापट करण्यास सुरुवात केली. खैरनार यांनी आरडाओरड करून नागरिक जमा केले. तोपर्यंत पोलिस ठाण्याचे पथकही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संशयिताला बेड्या ठोकल्या.
महिला पोलिसाचे कौतुक
खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. खुनाची माहिती मिळताच पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. तसेच, संशयिताला पकडल्याबद्दल महिला पोलिस कर्मचारी शारदा खैरनार यांचे आयुक्तांनी कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.