आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिसाॅर्ट कम अॅडवेंचर पार्कमध्ये सहासी खेळामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेची कुठल्याही प्रकारची काळजी न घेता झीप लाईन राईड करतांना महिला पर्यटक 25 फुट उंचीवरुन पडल्याने गंभीर जखमी झाली. ग्राहकाला रिसोर्ट कडून कुठल्याही सुविधा मिळाल्या नसल्याने ग्राहक न्यायालयात तक्रार दिली होती. न्यायालयाने रेनफाॅरेस्ट रिसाॅर्ट अँण्ड स्पाचे अवतार सिंह सेठी रा. बलायदुरी इगतपुरी यांना पर्यटकाच्या उपचाराचा खर्च 12 लाख 32 हजार आणि शारीरीक मानसिक त्रासपोटी 1 लाख 50 हजार रुपये देण्याचे सोमवारी आदेश दिले.
ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार सिद्धी पारख रा. जुना गंगापुरनाका यांनी ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला होता. बहिण कृती पटेल यांनी ऍक्टिव्हिटीज अॅडवेंचर पार्क येथे 29 डिसेंबर 2019 रोजी एक दिवसाची सात लोकांची बुकींग केली होती. पार्कमध्ये झीप लाईन राईड करत असतांना प्रशिक्षकाने हार्नेस लावले व राईड करता केबलला हुकने टकवले. राईडसाठी सुरक्षेसाठी हेल्मेट कॅप दिलेली नव्हती. तसेच बेल्टे निट बांधला का असे विचारले असता होय सांगीतले. 20 ते 25 फुट उंच गेल्यानंतर बेल्ट तुटल्याने पटेल जमीनीवर कोसळल्याने डोक्यास पाठीलला गंभीर मार लागला. घटना घडल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी कार मधून नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. घटना घडल्यानंतर रिसोर्टकडून कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही.
शस्त्रक्रियासाठी मुंबई येथे नेण्यात आले. सुमारे 11 लाख खर्च आला. रिसोर्ट व्यवस्थापनाने पैसे घेऊन ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही. अशी तक्रार दिली होती. न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे, सचिन शिंपी यांनी रिसोर्ट मालकाला ग्राहक कायद्या अंतर्गत ग्राहकाला 12 लाख 2 हजार 926 रुपये आणि शारीरी मानसिक त्रासापोटी 1 लाख 50 हजार तक्रार अर्जाचा खर्च 25 हजार देण्याचे आदेश दिले. तक्रारदार यांच्या वतीने अॅड. सुमेघा कुलकर्णी यांनी तर रिसोर्ट प्रशासनाच्या वतीने अॅड.जे.एन.शिंदे यांनी कामकाज पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.