आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई येथे काढण्यात आलेल्या हिंदु जागर मोर्चात माध्यमांशी बोलतांना मुस्लिम सुफीसताविषयी अपशब्द वापरुन अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी समाजाच्या भावना दुखवल्याने त्यांच्यावर धार्मिक भावना भडकवल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीकडून भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्याकडे करण्यात आली.
मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष अजिज पठाण,मुख्तार शेख,रशिद चाँद,ईब्राहीम अत्तार, रफिक साबीर आदी उपस्थित होते.निवेदनात म्हण्टले आहे की, 29 जानेवारीला मुंबई येथे काढण्यात आलेल्या हिंदु जागर मोर्चा मध्ये सहभागी असलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुस्लिम धर्माच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू पुरस्कार प्रयत्न केला तसेच सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले अजमेर येथील सुफी संतख्वाजा गरीब नवाज यांच्या विषयी अपमान जनक शब्दांचा वापर केला तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुखी मुस्लिम द्वेष शब्द टाकून संविधानाचे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सुद्धा अपमान करण्याचा धार्मिक द्वेष मनात ठेवून हिंदू मुस्लिम दंगल लावण्याचे हेतूने विकृत मानसिकेतून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
जवळच्याच काळात माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे हेट स्पीच देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे तसेच भारतीय संविधानानुसार धार्मिक द्वेष निर्माण करणे महापुरुषांचा अपमान करणे अशा प्रकारचा गुन्हा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दाखल करण्यात यावा असा निवेदन मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र यांच्या मार्फत भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पुलिस निरीक्षक यांना देण्यात आले.यावेळी ईमरान तांबोळी, अकील खान, रफिक साबीर, फिरोज मंसुरी व सकल मुस्लिम युवक महाराष्ट्राचे नाशिक शहर संघटक फहिम शेख हे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.