आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांवर गुन्हा दाखल करा:छावा क्रांतिवीर सेनेची मागणी; कोश्यारींच्या विरोधात घेतली आक्रमक भूमिका

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवद्रोही असून छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे राष्ट्रपुरुष आहेत. कायद्यानुसार राष्ट्रपुरुषांची बदनामी अथवा त्यांच्याविषयीचा चुकीच बोलून ते पसरवण्याचे कृत्य गुन्हा ठरतो. त्यामुळे त्यांच्या वर गुन्हा दाखल करा, अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेने केली असून याबाबत अंबड पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापाठीच्या पदवी प्रदान कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आता जुने झाले, आजच्या काळातील आदर्श घ्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. राज्याचे राज्यपाल हे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करत आहे. अपमान जनक बोलणं संदर्भहीन बोलणे, वादग्रस्त बोलणे, हे राज्यपाल कोशारी यांचे एकूण व्यक्तिमत्व दिसते. यापूर्वी देखील राज्यपाल यांनी असंच अपमान जनक वक्तव्य केलेले आहेत.

राज्यपाल कोशारी यांनी जे वक्तव्य केलेले आहे. ते छत्रपती शिवाजी राजांचा अवमान करणारे वक्तव्य आहे. कोश्यारी हे महाराष्ट्रद्रोही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ, या तिन्ही काळाला प्रेरणा देणार असे व्यक्तिमत्त्व आहे. ते कधीही कालबाह्य होणारे व्यक्तिमत्त्व नाही. कायद्यानुसार राष्ट्रपुरुषांची बदनामी अथवा त्यांच्याविषयीचा चुकीचा इतिहास पसरवण्याचे कृत्य केल्यामुळे त्यांच्या वर गुन्हा करावा याबाबत छावा क्रांतीवीर सेना नाशिक तर्फे संस्थापक करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.

या वेळी आशिष हिरे, नितिन दातीर, नाशिक शहर अध्यक्ष योगेश गांगुर्डे, दिनेश नरवडे, शुभम महाले, अर्जुन शिरसाठ, मदन गाडे, बंटी पाबळे, अर्जुन पाटील, धैर्यशील पाटील, दीपक खताळे सह पदाधिकारी उपस्थित होते. राज्यपालांवर गुन्हा दाखल करा या मागणीचे छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने अंबड पोलिसांना निवेदन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...