आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतीशताब्दी वर्ष:जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराजांवर चित्रपट, जीवनकार्य जनसामान्यांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचे आणि अभिमानाचे स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर ‘शाहू छत्रपती’ हा चित्रपट आकारास येताे आहे.

ब्रिटीश राजसत्तेच्या काळात रयतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी लढणारे, सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्य चित्रपटाद्वारे जनसामान्यांपर्यत पोहचविण्याचा या चित्रपटातून प्रयत्न हाेताे आहे. या चित्रपटाची कथा ज्येष्ठ लेखक डाॅ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशाेधनातून घेण्यात आळी आहे. तर वरुण सुखराज त्याचे दिग्दर्शन करत आहेत.

मराठीसह इतर भाषांमध्येही चित्रपट

यंदाचे वर्ष हे राजर्षी शाहू महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे. राजर्षी शाहूंनी त्यांच्या कारकिर्दीत काळाच्या पुढे असणारे जनकल्याणाचे असंख्य निर्णय घेतले आणि राबवले. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, स्त्रिया, दलित अशा समाजघटकांसाठी राजर्षी शाहूंनी भरीव कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे अशा अग्रगण्य समाजसुधारकांना राजर्षी शाहूंनी सर्वार्थाने सहाय्य केले. राजर्षी शाहूंचा गौरवशाली इतिहास लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना या भव्य चरित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीसोबत इतर भाषांमध्येही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. इतर ऐतिहासिक चरित्रपटांहून वेगळ्या कालखंडात घडणारी ही कथा असून यााद्वारे शाहू महाराजांच्या काळातील महाराष्ट्र मोठ्या पडद्यावर पहायची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्याचे यानिमित्ताने वरुण सुखराज यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...