आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यानंतर मनपा निवडणुकीचा फड:नाशिक मनपाच्या 44 प्रभागांसाठी 17 जून रोजी प्रसिद्ध होणार अंतिम प्रभाग रचना

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणूक पावसाळ्यानंतर होणार असली तरी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना, आरक्षण सोडत जाहीर केल्यानंतर आता प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर करण्यासाठी देखील टॉप गिअर टाकला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 17 जून रोजी नाशिक महापालिकेच्या 44 प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यावर हरकती व सूचनांकरीता आठवडाभराची मुदत दिली जाणार आहे.

अयोगाकडून तयारी सुरू

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रदीर्घ काळ सुनावणीस चालल्यामुळे मार्च महिन्यात राज्यातील 18 महापालिकांची निवडणूक होऊ शकली नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग गतिमान झाला. त्याचाच एक भाग म्हणून 13 मे रोजी अंतिम प्रभागरचना जाहीर केल्यानंतर पुढील दोन आठवड्यातच अर्थातच 31 मे रोजी महापलिकांच्या माध्यमातून ओबीसीशिवाय अनुसूचित जाती(महिला), अनुसूचित जमाती(महिला) आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरीता आरक्षण सोडत काढली. प्रभाग रचना , आरक्षण व त्यानंतर थेट निवडणूक अर्थातच मतदान प्रक्रियेपर्यंतची कारवाई करणे अपेक्षित असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम अंतिम करण्यास सुरुवात केली आहे.

अंतिम यादी प्रसिद्ध होणार

मार्च महिन्यात निवडणूक होतील असे गृहीत धरून महापालिकेच्या निवडणूक विभागाने 5 जानेवारी 2022 रोजी भारत निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या मतदार यादीनुसार 44 प्रभागांसाठी अंशता मतदार यादी तयार केली होती. मात्र अंतिम प्रभागरचनेमध्ये जवळपास सहा प्रभागांमधील हद्दीमध्ये बदल झाल्यामुळे त्यानुसार दुरुस्ती करून आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

असा आहे मतदारा याद्यांचा कार्यक्रम

17 जून रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द केल्यानंतर 17 ते 25 जून पर्यंत हरकती व सूचना यांसाठी मुदत दिली जाईल. त्यानंतर 7 जुलै रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिध्द केल्या जातील. दरम्यान, मतदार याद्यांकरीता 1 जानेवारी 2022 हा अर्हता दिनांक धरून भारत निवडणूक आयोगाकडून 31 मे 2022 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेची मतदार यादी वापरली जाणार आहे. विधानसभा मतदार याद्यांचे प्रभागांच्या क्षेत्रानुसार विभाजन केले जाणार आहे. तसेच सुधारित मतदारयादीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवले जाणार असल्याची माहिती उपायुक्त मनोज घोडे - पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...