आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:अखेर तीन वर्षांनंतर उद्याेगांसाठी ‘झूम’च्या बैठकीला लागला मुहूर्त

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर उद्याेजकांनी वारंवार मागणी केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर उद्याेजकांचे प्रश्न साेडविण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जिल्हा उद्याेग मित्र समितीच्या (झूम) बैठकीला मुहूर्त मिळाला आहे. २३ नाेव्हेंबर राेजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सकाळी ११ वाजता ही बैठक हाेत आहे. आैद्याेगिक संघटनांना याबाबतचे पत्र मिळाले आहे. यापूर्वीची बैठक १८ नाेव्हेंबर २०१९ राेजी झाली हाेती. त्यात ३५ विषय उद्याेजकांनी उपस्थित केले हाेेते. त्यावर काय कार्यवाही झाली हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उद्याेगांच्या समस्या व प्रश्न साेडविण्यासाठी एमआयडीसी, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा परिषद यांसारख्या संबंधित सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्याेजक संघटनांचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक व्हावी याकरिता राज्य शासनाने जिल्हा उद्याेग समितीची ही बैठक महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केलेले आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष व जिल्हा उद्याेग केंद्राचे महाव्यवस्थापक समन्वयक असल्याने बैठकीला तितकेच महत्त्व असून ही बैठक नियमित आयाेजित करण्याचे संकेत आहेत.

मात्र, याकडे नाशिकमध्ये यापूर्वीचा इतिहास पाहता दुर्लक्ष झालेले दिसून येते. काेराेना काळात बैठक हाेऊ शकली नसल्याचे उद्याेजकही मान्य करतात मात्र, सर्व काही सुरळीत हाेऊन दीड वर्ष उलटले. उद्याेजक संघटनांनी वारंवार या बैठकीकरिता मागणी केली तरीही बैठक हाेत नसल्याचे उद्याेजकांत नाराजीचा सूर हाेता. या पार्श्वभूमीवर हाेऊ घातलेल्या बैठकीत काय निर्णय हाेतात व उद्याेगांचे काेणते प्रश्न मार्गी लागतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाचे निर्णय जागेवर व्हावेत
तीन वर्षानंतरही मागील बैठकीतील प्रश्न आजही कायम आहेत, यामुळे हाेत असलेल्या या बैठकीला सर्व संबंधित विभागांच्या निर्णयक्षम अधिकाऱ्यांनी उपस्थित रहाणे गरजेचे आहे. मागील बैठकीतील टिप्पणी, झालेल्या मागण्यांवर अभ्यास करूनच यावे जेणेकरून समस्या सुटून बैठक सफल हाेऊ शकेेल. -निखिल पांचाळ, अध्यक्ष, आयमा

बैठकीतून प्रश्न सुटले पाहिजे
जिल्हा उद्याेग समितीच्या या बैठकीत उदयाेजकांकडून जे प्रश्न मांडले जातात, त्यावर जिल्हा उद्याेग केंद्राकडून पाठपूरावा व्हायला पाहीजे, ताे हाेत नाही. यामुळे वर्षानुवर्ष अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उद्याेजकांच्या समस्यांसाठी नियमित बैठक हाेऊन परिणाम दिसताेच हे तत्व लक्षात घेणे महत्वाचे आहे.- जयप्रकाश जाेशी, ज्येष्ठ उद्याेजक

बातम्या आणखी आहेत...