आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उशिराचे शहानपण:अखेर एमआयडीसीमधील नाले सफाई सुरू, आज एकत्रित पाहणी ; आयमाला दरवर्षीच करावा लागतो पाठपुरावा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड औद्योगिक वसाहतीतील नालेसफाईला अखेर महापालिकेकडून सुरुवात झाली आहे. यामुळे सखल भागात कंपन्यांमध्ये पाणी शिरून होणारे संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे. वास्तवात पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून महापालिकेकडून न चुकता नालेसफाई होणे अपेक्षित आहे. मात्र, दरवर्षी उद्योजकांची संघटना असलेल्या आयमाला याकरिता महापालिकेकडे पत्रव्यवहार करावा लागतो आणि अगदी पावसाळ्याच्या तोंडावर घाईघाईने ही सफाई होत असते. यंदा मात्र वेळेत सफाई सुरू झाली असल्याने समाधान व्यक्त होत आहे. अंबड औद्योगिक वसाहत डोंगराच्या पायथ्याशी वसलेली असल्याने तसेच येथील नैसर्गिक नाल्यांना बंदिस्त केले गेल्याने त्यांचा संकोच झालेला आहे. यामुळे मोठा पाऊस आला तर खालच्या भागातील कंपन्यांमध्ये थेट पाणी शिरते. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा झाल्या आहेत. कंपन्यांचा कच्चा माल, उत्पादित माल, मशिनरी पाण्यात बुडाल्याच्या तक्रारी उद्योजकांकडून झाल्या आहेत. यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या किमान महिनाभर अगोदर महापालिकेने नालेसफाईचे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र, याकरिता उद्योजकांची संघटना आयमाला पत्रव्यवहार करावा लागतो, त्यानंतर महापालिकेला जाग येते अशी दुर्दशा येथे दिसून येते. आता हे काम सुरू झालेले असून अजून बऱ्याच ठिकाणी ते होणे बाकी आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गरज पडेल तेव्हा मदत पुरविण्याची तयारी उद्योजकांनी दर्शविली असल्याचे उद्योजक व आयमाच्या पायाभूत सुविधा समितीचे पदाधिकारी कुंदन डरंगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...