आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांची गैरसोय:अखेर जयभवानी राेड पथदीपांनी उजळला

नाशिकराेड3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयभवानीरोड या मुख्य मार्गावरील पथदीप अनेक दिवसांपासून खराब झाले होते, तर काही बंद झाले होते. त्यामुळे पथदीप असूनही रस्त्यावर प्रकाश पडत नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर आता हा परिसरात पथदीपांची कामे सुरू झाली आहेत. मुख्य रस्ता असलेल्या या परिसरात अंधार असल्याने नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती. जेतवननगर ते औटे मळा, आर्टिलरी सेंटररोड या परिसरात नवीन पथदीप बसविण्यात आल्याने आता रस्त्यावर पथदीप मात्र जवळच अंधार अशा दुजाभावामुळे नागरिक संतापले हाेते. या पथदीप कामांसाठी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) योगिता गायकवाड, योगेश देशमुख, स्वप्नील औटे सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड यांनी पालिकेच्या संजय कुलकर्णींकडे सतत पाठपुरावा केला होता.

बातम्या आणखी आहेत...