आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमतरतेमुळे रुग्णालय हाेते बंद:अखेर मुलतानपुरा रुग्णालय सुरू करण्यासाठी जानेवारीचा मुहूर्त

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या नाशकातील मुलतानपुरा येथील महापालिकेच्या सय्यदानी माजीसाहेबा रुग्णालय नूतनीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले असून जानेवारीपासून हे रुग्णालय खुले हाेणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जुन्या नाशकातील या १५ खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही ते सुरू करण्यात येत नव्हते. या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव माजी नगरसेवक सुफी जीन व नगरसेविका समिना मेमन यांनी महासभेत मांडला होता. त्यानंतर गेल्यावर्षी त्याचे काम सुरू झाले हाेते. मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ते सुरू केले जात नव्हते. आता कर्मचारी उपलब्ध केले जाणार असल्याने जानेवारीत रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...