आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडाईतर्फे प्रशिक्षण:आर्थिक नियोजन ही सफल व्यवसायासाठी गुरुकिल्ली; सफल व्यवसायासाठी सांगितले उपाय

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

योग्य आर्थिक नियोजन ही सफल व्यवसायाची गुरुकिल्ली असून आदर्श पद्धतीने नफा कमविणारा व्यावसायिक त्याच्या स्वतःसोबतच त्याच्यासोबत काम करणाऱ्या अनेकांच्या प्रगतीस जबाबदार असतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट व ‘रोमांसिंग द बॅलन्स शीट या बेस्ट सेलर’ पुस्तकाचे लेखक अनिल लांबा यांनी केले.

क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये “सफल व्यवसायासाठी कॉस्ट मॅनेजमेंट” या विषयावर लांबा बाेलत होते. क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, उपाध्यक्ष कृणाल पाटील, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, नेमीचंद पोतदार, किरण चव्हाण, उमेश वानखेडे, कमिटी सदस्य अतुल शिंदे, सुशील बागड आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन चिन्मय खेडेकर यांनी केले.

क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की, सर्व सदस्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी प्रशिक्षण क्रेडाईतर्फे नियमितरीत्या आयोजित केले जाते. सह समन्वयक अनिल आहेर यांनी सांगितले की, प्रशिक्षण शिबिरात २०० हून अधिक क्रेडाई सदस्य नाशिक, नगर, धुळे, ओझर, पिंपळगाव, मालेगाव, पाचोरा, शिर्डी येथून सहभागी झाले होते. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात प्रख्यात कायदेतज्ज्ञ ॲड. एस के पांडे व ॲड. संजय पाटील यांनी कायद्याच्या विविध तरतुदीबाबत मार्गदर्शन केले. क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल म्हणाले की, क्रेडाई महाराष्ट्रतर्फे अशा कार्यक्रमाचे आयोजन आगामी कालावधीत औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नवी मुंबई येथे होणार आहे.

भांडवलाची उभारणी कशाप्रकारे? यावर नफा अवलंबून
अनिल लांबा पुढे म्हणाले की, व्यवसाय उभारताना भांडवलाची उभारणी कशाप्रकारे केली जाते यावर व्यवसायाचा नफा अवलंबून असतो. किती विक्री झाली यापेक्षा कॅश फ्लोचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचे सांगून नफ्यापेक्षा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवर लक्ष केंद्रित करावे. व्यवसाय करताना पहिले परिश्रम घ्या.

बातम्या आणखी आहेत...