आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडनेर दुमाला रोडवरील घटना:गोदामासह भंगार बाजाराला आग; तब्बल 10 बंबाद्वारे विझवली आग

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी फाटा ते देवळाली कॅम्प राेडवरील वडनेर दुमाला परिसरात गुरुवारी (दि. ३) पहाटे फर्निचरच्या गोदामाला लागलेल्या आगीने राैद्ररूप धारण केल्याने गाेदामाच्या बाजूला असलेल्या फर्निचर दुकानासह शेजारील चार ते पाच घरे, वाहने देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यात २० लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाच व्यक्त हाेत आहे. दिवसभर अग्निशमनच्या तब्बल १० बंबाद्वारे आग विझविण्यात आली. याप्रकरणी इंदिरानगर पेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडनेर दुमाला रोडवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास एम. के. फर्निचर मॉल आणि गोदामाला आग लागली. लाकडी साहित्याने पेट घेतला. दुकानाच्या बाजूला असलेल्या पाच घरांना हानी पोहोचली. वाहनेही या आगीत जळाली. आग लागल्याचे कळताच पहाटेच्या पंधरा-वीस कामगार व कुटुंबियांनी बाहेर पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एका पाठाेपाठ एक अशा दहा बंबाच्या मदतीने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पंचमान्यनंतर नुकसानीचा आकडा समाेर येणार असला तरी २५ ते ३० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...