आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीवर राेष व्यक्त:कच्चा माल अस्ताव्यस्त पसरल्याने ‘जिंदाल’मध्ये आग नियंत्रणास बाधा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत रविवारी लागलेली आग त्वरित पसरण्यामागे कंपनीत अस्ताव्यस्त पडलेला व अतिरिक्त साठवून ठेवलेला कच्चा माल, स्क्रॅप यांसारख्या दुर्लक्षित न करता येणाऱ्या गंभीर बाबी समाेर आल्या आहेत. कंपनीचे सेफ्टी आॅडिट गत महिन्यातच झाल्याचे समाेर आले असले तरी सुरक्षा नियमांनुसार कंपनीच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा कॅबिनपासून महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक असलेला आॅनसाइट इमर्जन्सी प्लॅन तसेच कंपनीचा नकाशाही लावलेला नसल्याचे तसेच अग्निशमन दलाला हा नकाशा उपलब्ध झाला नसल्याचे सांगण्यात येते.दरम्यान, आगीची घटना घडली त्यावेळी कंपनीत नेमके किती कामगार उपस्थित हाेते, याबाबतची माहिती दिली जात नसल्याने स्थानिकांनी कंपनीवर राेष व्यक्त केला आहे.

रविवारी दिवसरात्र ही कंपनी अक्षरश: धुमसत हाेती. साेमवारी दुपारी आगीवर नियंत्रण मिळाले, मात्र धुराचे लाेट अद्यापही पहायला मिळत आहेत. या गंभीर घटनेनंतर अशा घटना घडू नयेत याबाबतच्या कंपनीच्या त्रुटी समाेर येत आहेत. कंपनीमध्ये कच्चा माल, स्क्रॅप प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणावर स्टाेअरेजची जागा साेडून खचाखच भरलेला पहायला मिळाला. मुळात हे सगळे मटेरियल आगीसाठी पूरक हाेते, त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे हाेते, ती घेतली गेली नसल्याचे येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला दिसून आले.

कंपनीने कामगारांची संख्या अद्याप दिली नाही
कंपनीत १४५० कंत्राटी कामगार तर १२५० कायम कामगार काम करतात. एका शिफ्टमध्ये येथे किमान ७०० कामगार काम करतात. मात्र रविवार असल्याने ही संख्या कमी हाेती. नेमके किती कामगार घटना घडली त्यावेळी कार्यरत हाेते, याची माहिती अद्याप कंपनी संकलित करत आहे. त्यांनी अद्याप ही माहिती दिलेली नाही. - विकास माळी, कामगार उपायुक्त

बातम्या आणखी आहेत...