आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात चार उद्योगांना आग:लाखोंचे साहित्य जळून खाक;  पाच अग्निशमन बंबांच्या मदतीने आग विझविण्यात यश

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड औद्योगिक वसाहती लगतच्या चार लघु उद्योगांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत या उद्योगांचे साहित्य जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर या उद्योगांना लगत असलेल्या तीन उद्योगांनाही मोठी झळ बसली आहे.

आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले हे उद्योग पत्र्याचे गाळेवजा शेडमध्ये एकमेकास लागून आहे. या उद्योगांपैकी एका उद्योगात दुपारी साडेचार वाजता आग लागली.घटनेची माहीती मिळाल्यानंतर अंबड औद्योगिक वसाहत अग्नीशमन विभागाचा बंब येथे तातडीने पोहचला. त्यानंतर आग अटोक्यात न आल्याने सिडको व सातपूर अग्निशमन केंद्राचे प्रत्येकी दोन बंब येथे पोहचले, तीन तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग विझविण्यात यश आले.

श्लोक एंटरप्रायजेस ही क्लिनिंग मटेरीयलची कंपनी तर लान्सर अॅन्ड कंपनी ही फायबर मोल्डींगची कंपनी, स्प्रे पेंटींगची जे.पी.इंटरनॅशनल आणि पावडर कोटींगची आस एंटरप्रायजेस अश्या या कंपन्यांची नावे आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. या सर्व कंपन्यांमधील उत्पादन व साहित्य हे आगीला पुरक असल्याने तसेच एलपीजी सिलेंडर असल्याने व त्यांचा एकापाठोपाठ स्फोट झाल्याने, आग वेगाने पसरल्याचे समजते. याचमुळे एका कंपनीला आग लागल्यानंतर ती शेजारील कंपन्यांमध्ये पसरली. एलपीजी सिलेंडरचे ब्लास्ट अंबड औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन विभागाचा बंब तातडीने दाखल झाल्याने आग आटोक्यात येइपर्यंत लाखो रूपयांचे साहित्य जळाल्याने मोठी आर्थिक झळ या कंपन्यांना बसली आहे.

पाच बंबांनी तीन तासात आगीवर नियंत्रण

कुलस्वामीनी इंटस्ट्रीयल एरीया ह्या खासगी सर्वे क्रमांकामध्ये हे उद्योग असून येथे सात एलपीजी सिलेंडर होते, त्यापैकी त्यापैकी सहाचा ब्लास्ट झाला. सातपूर, सिडको येथील बंबही तातडीने पोहचले तीन तासांत ही आग विझविण्यात यश आले. सुदैवाने कोणतेही जीवीतहानी किवा कुणला दुखापत झालेली नाही. या चार उद्योगांचा लगत असलेल्या साइचैतन्य लॉजिस्टिक प्रायवेट लिमिटेड, सिध्दीविनायक इंजिनिअरींग टेक्नो इंडस्ट्रीज यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

दुरवरून आकाशात असे धुराचे लोट दिसून येत होते.
दुरवरून आकाशात असे धुराचे लोट दिसून येत होते.
बातम्या आणखी आहेत...